मराठी भाषा गौरव दिन माहिती
दरवर्षी 27 फेब्रुवारी ला मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो . अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की ' मराठी भाषा गौरव दिवस ' म्हणून दरवर्षी 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो ? ते इंटरनेट वर सर्च करत असतात की मराठी भाषा गौरव दिवस म्हणजे काय ? , मराठी भाषा गौरव दिवस माहिती इत्यादी .
म्हणून आजच्या आमच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला मराठी भाषा गौरव दिनाची माहिती देणार आहोत.
तर तुम्ही ही ब्लॉग पोस्ट शेवटपर्यंत वाचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो .
मराठी भाषा गौरव दिन माहिती
दरवर्षी 27 ला महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णु वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो . कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे .
मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी म्हणून त्यांनी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व तसेच महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन ' मराठी भाषा गौरव दिन ' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय 21 जानेवारी 2013 ला घेण्यात
आला.
मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो
भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 347 अनुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याचा तरतूद व अधिकार भारताचे राष्ट्रपती यांना आहेत.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी ज्येष्ठ कवी विष्णु वामन शिरवाडकर यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेत महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस ' मराठी भाषा गौरव दिन ' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेतला .
मराठी भाषेविषयी रोचक तथ्य
- मराठी भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे .
- 2011 च्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषकांची संख्या 14 कोटी आहे .
- मराठीचे वय 2400 वर्षे आहे .
- मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी मोठी भाषा आहे.
- मराठी भाषेतील पहिला ग्रंथ गाथासप्ती हा 2000 वर्ष जुना आहे .
- मराठीच्या अनेक बोलीभाषा अस्तित्वात आहेत . उदा .अहिराणी , कोकणी , मालवणी , तंजावर मराठी , नागपुरी , झाडीबोली इत्यादी
- मराठी भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जाते.
तर ही होती मराठी भाषा गौरव दिनानिमित्त माहिती . तुम्हाला ही माहिती व मराठी भाषेचे रोचक तथ्य कसे वाटले . आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा .
ही ब्लॉग पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद .
तुमचा वर्तमान वेळ व पूर्ण दिवस शुभ , निरोगी जावो हीच सदिच्छा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा