दिवाळी सण माहिती मराठी
दिवाळी सण हा दरवर्षी साजरा केला जातो . हा एक भारतीय सण आहे. जो जगभरात साजरा केला जातो. आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये आपण दिवाळी सणाची माहिती घेणार आहोत. दिवाळी सण माहिती मराठी दिवाळी हा एक भारतीय सण आहे. जो पाच दिवसांचा असतो. दिवस पहिला - धनत्रयोदशी :- या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करतात दिवस दुसरा - नरक चतुर्दशी :- या दिवशी भगवान कृष्णाने नरकाशुर राक्षसाला ठार केले . तिसरा दिवस - लक्ष्मीपूजन :- या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात. चौथा दिवस - बलिप्रतिपदा :- या दिवशी गाय , बैल इत्यादींची पूजा करतात. उत्तर भारतात गोवर्धन पर्वताची पूजा करतात. पाचवा दिवस - भाऊबीज :- या दिवशी बहीण भावाला ओवाळते . व भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. दिवाळीच्या दिवसात घरी फराळ तयार करतात . एकमेकांना शुभेच्छा देतात . वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतात. त्यांच्या पाया पडतात. फटाके फोडले जातात. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण व दुष्परिणाम रोखण्यासाठी काही जन फटाके फोडत नाही. आकाशकंदील तयार करतात. घर , कार्यालय , दुकाने , मॉल्स इत्यादींवर विद्युत रोषणाई करण्यात येते. दिवाळी ...