दिवाळी सण माहिती मराठी
दिवाळी सण हा दरवर्षी साजरा केला जातो . हा एक भारतीय सण आहे. जो जगभरात साजरा केला जातो. आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये आपण दिवाळी सणाची माहिती घेणार आहोत.
दिवाळी सण माहिती मराठी
दिवाळी हा एक भारतीय सण आहे. जो पाच दिवसांचा असतो.
दिवस पहिला - धनत्रयोदशी :- या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करतात
दिवस दुसरा - नरक चतुर्दशी :- या दिवशी भगवान कृष्णाने नरकाशुर राक्षसाला ठार केले .
तिसरा दिवस - लक्ष्मीपूजन :- या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात.
चौथा दिवस - बलिप्रतिपदा :- या दिवशी गाय , बैल इत्यादींची पूजा करतात. उत्तर भारतात गोवर्धन पर्वताची पूजा करतात.
पाचवा दिवस - भाऊबीज :- या दिवशी बहीण भावाला ओवाळते . व भाऊ बहिणीला ओवाळणी देतो.
दिवाळीच्या दिवसात घरी फराळ तयार करतात . एकमेकांना शुभेच्छा देतात . वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतात. त्यांच्या पाया पडतात.
फटाके फोडले जातात. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण व दुष्परिणाम रोखण्यासाठी काही जन फटाके फोडत नाही.
आकाशकंदील तयार करतात. घर , कार्यालय , दुकाने , मॉल्स इत्यादींवर विद्युत रोषणाई करण्यात येते.
दिवाळी हा सण आपल्या भारत देशात मोठ्या उत्साहाने व प्रेमाने साजरा करतात. दिवाळी सण जगातील अनेक देशांत साजरा केला जातो .
भारत , श्रीलंका , मलेशिया , सिंगापूर देशात दिवाळीनिमित्त सुट्टी असते . अमेरिकेत भारतीय सामानाची दुकाने सजतात.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली . आम्हाला कमेंट बॉक्स द्वारे नक्की कळवा. ब्लॉगला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद .
असेच या ब्लॉगला भेट देत जा . तुमचा वर्तमान वेळ आणि संपूर्ण दिवस शुभ, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जावो हीच सदिच्छा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा