महाराष्ट्र राज्य सामान्य माहिती
या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र राज्याची सामान्य माहिती प्रश्न उत्तराच्या स्वरूपात घेणार आहोत .
चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या ब्लॉग पोस्टला ज्याचे नाव आहे महाराष्ट्र राज्य सामान्य माहिती
महाराष्ट्र राज्य सामान्य माहिती
1. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर :- महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली .
2. महाराष्ट्र राज्याच्या शेजारी कोणती राज्ये व केंद्रशासित प्रदेश आणि समुद्र आहेत ?
उत्तर : महाराष्ट्र राज्याच्या शेजारी गुजरात , मध्य प्रदेश , छत्तीसगड, तेलंगणा , कर्नाटक , गोवा ही राज्ये व दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश ; तसेच अरबी समुद्र हा समुद्र आहे.
3. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत व कोणते ?
उत्तर : महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत . ते पुढीप्रमाणे
1.मुबई शहर जिल्हा
2.मुबई उपनगर जिल्हा
3.ठाणे
4.पालघर
5.रायगड
6.रत्नागिरी
7. सिंधुदुर्ग
8.पुणे
9.सातारा
10.सांगली
11. कोल्हापूर
12.सोलापूर
13. नाशिक
14.अहील्यानगर ( पूर्वीचा अहमदनगर )
15.धुळे
16.जळगाव
17. नंदुरबार
18. छत्रपती संभाजी नगर ( पूर्वीचा औरंगाबाद )
19.जालना
20.परभणी
21. बीड
22.हिंगोली
23.लातूर
24. नांदेड
25.धाराशिव ( पूर्वीचा उस्मानाबाद )
26. अमरावती
27. अकोला
28. बुलढाणा
29.वाशीम
30. यवतमाळ
31.नागपूर
32.वर्धा
33. चंद्रपूर
34. गडचिरोली
35. गोंदिया
36. भंडारा
महाराष्ट्र राज्याची राजभाषा कोणती आहे ?
उत्तर : मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे .
कृपया वाचा : मराठी भाषा गौरव दिन माहिती
4. महाराष्ट्र राज्याची राजधानी व उपराजधानी कोणती आहे ?
उत्तर : मुंबई ही राजधानी व नागपूर ही उपराजधानी आहे.
5. महाराष्ट्र राज्यात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत व कोणते ?
उत्तर : महाराष्ट्र राज्यात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत ते पुढीलप्रमाणे
1.कोकण
2.पुणे
3. नाशिक
4. छत्रपती संभाजी नगर ( पूर्वीचा औरंगाबाद )
5.अमरावती
6.नागपूर
तर तुम्हाला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा .
ब्लॉग पोस्टला शेवटपर्यंत वाचल्याबदल धन्यवाद.
तुमचा वर्तमान वेळ आणि पूर्ण दिवस शुभ, निरोगी जावो हीच सदिच्छा .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा